रिफायनरीमुळे निर्माण होणाऱ्या रोजगारांविषयी संकलन करणार – पंढरीनाथ आंबेरकर

0

रत्नागिरी: ग्रीन रिफायनरीमुळे किती बेरोजगार तरुणांना रोजगार मिळू शकेल, यासाठी माहिती संकलन करण्याचा निर्णय कोकण जनकल्याण प्रतिष्ठानने घेतला आहे. राजापूर तालुक्यातील प्रस्तावित ग्रीन रिफायनरी प्रकल्पामुळे सुमारे एक लाखापेक्षाही अधिक लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे आता तालुक्यातील बेरोजगार युवक-युवतींचे संघटन करून त्यांच्या शैक्षणिक कौशल्याप्रमाणे त्यांना नोकरी आणि आवश्यक ते प्रशिक्षण देण्यासाठी कोकण जनकल्याण प्रतिष्ठानने पुढाकार घेतला आहे. तालुक्यातील बेरोजगार तरुण-तरुणींची माहिती संकलित करून या प्रकल्पाच्या माध्यमातून भविष्यात त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंढरीनाथ आंबेरकर यांनी दिली.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here