आडिवरे येथील नांदगावकर बंधूंच्या लाकडी वस्तूंच्या प्रदर्शनाला भरघोस प्रतिसाद

0

राजापूर: सुतारकलेला नव संजीवनी देण्यासाठी ती नावारूपास आणण्यासाठी राजापूर आडिवरे, नवेदर वाडीतील किरण व दुर्गेश या नांदगावकर बंधूनी नुकतेच लाकडी वस्तूंचे प्रदर्शन आयोजित केले. त्यामध्ये लाकडी मुखवट्यांसह, विविध घरगुती वापराच्या तसेच लोकोपयोगी लाकडी वस्तूंची मांडणी केली होती. राजापूर तालुक्यातील आशाप्रकारचे हे पहिलेच प्रदर्शन होते. या प्रदशनाचं उद्घाटन लांजा आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण सुतार (अध्यक्ष, विश्वकर्मा पांचाळ सुतार समाज मंडळ-लांजा) यांच्या हस्ते झाले. यावेळी राजापूर-मुर गावचे सरपंच संजय सुतार (कार्याध्यक्ष, विश्वकर्मा पांचाळ सुतार समाज मंडळ राजापूर), संतोष पांचाळ (उपाध्यक्ष) प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यामध्ये लाकडी मुखवटे, लाकडी गिटार, लाकडी शिल्प, विविध प्रकारच्या खुर्ची, छोटा रंदा, लाकडी पाट, स्टूल, टू इन वन खुर्चीघोडा, लाकडी साखळी, पर्ससीन नौका प्रतिकृती, किरण पांचाळ टेबल, मोरावळी अशा प्रकारे एकूण २७ वस्तूंचा समावेश आहे. त्यांच्या या कामगिरीबद्दल ते विशेष कौतुकास पात्र ठरले.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here