शिव येथे क्षयरोग दिनानिमित्त विविध कार्यक्रम

0

लोटे : जागतिक क्षयरोग दिनाचे औचित्य साधून एम. इ. एस. कॉलेज ऑफ नर्सिंग व प्राथमिक आरोग्य केंद्र शिव यांच्या वतीने शिव गावामध्ये दि. २३ मार्च रोजी क्षयरोग जनजागृती मोहीम राबविण्यात आली.

या कार्यक्रमाचा भाग म्हणून नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी गावात जनजागृती फेरीचे आयोजन केले. तसेच शिव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात क्षयरोग जनजागृतीपर पथनाट्य सादर केले. या कार्यक्रमाला शिव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नदाब व भीमराव काळे तसेच एम. इ. एस. कॉलेज ऑफ नर्सिंगचे शिक्षक उपस्थित होते.

दि. २५ रोजी याच कार्यक्रमाचा भाग म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र पिरलोटे येथेही कार्यक्रम घेण्यात आला. प्रा. आ. केंद्र पिरलोटे ते आठवडा बाजार अशी जनजागरण फेरी, तसेच पथनाट्य सादर करण्यात आले. यावेळी सर्वांनी क्षयरोग नियंत्रणाची प्रतिज्ञा घेतली.

वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन कदम, ग्रामविकास अधिकारी जी. डी. केदार, ग्रामपंचायत सदस्य शितल ठसाळे, श्री. शेरे व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमास डॉ. शामसुंदर भाकरे व प्राचार्य मिलिंद काळे यांचे मार्गदर्शन लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here