पालशेत ते नागझरी रस्त्याची दुरवस्था

0

गुहागर : तालुक्यातील पालशेत मारुती मंदिर ते नागझरी या रस्त्यावर मोठमोठे खड्डे तसेच खडी रस्त्यावर आल्याने रस्त्याची
अवस्था बिकट झाली आहे. रस्त्यात जागोजागी खड्डे पडून रस्त्याची चाळण झाली आहे.

मारुतीमंदिर ते मांडवकरवाडीपर्यंत रस्ता काहीसा सुस्थितीत असून मांडवकरवाडी ते नागझरी हा रस्ता पूर्णत: उखडला आहे. या रस्त्यावर आलेल्या खडीमुळे गाडी चालविणे जिकिरीचे बनले आहे. त्यामुळे या रस्त्यावरुन गाडी घसरून अपघात होण्याची
शक्यता आहे. तसेच या रस्त्याची खडी वर आल्याने गाड्यांचे टायर पंक्चर होत आहेत. शिमगोत्सवाला आलेल्या चाकरमान्यांनाही या खड्ड्यांमुळे त्रास सहन करावा लागला. रस्त्यात पडलेले खड्डे बुजविण्याचे काम संबंधित विभागाने करावे, अशी मागणी येथील ग्रामस्थ व वाहनधारकांतून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here