चिपळूण पोलिसांनी चोरीमध्ये गहाळ झालेले मंगळसूत्र महिलांना मिळवून दिले आहे. परिसरातील सात महिलांना सुमारे पाच लाख रूपये किंमतीचे १७ तोळे वजनाचे दागिने जिल्हा पोलिस अधीक्षक प्रवीण मुंढे यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. गेल्या दोन वर्षांत चिपळूण परिसरात दागिने चोरीच्या घटना घडल्या. साखळी चोरांनी महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र ओढून नेऊन लांबविल्याच्या घटना सातत्याने घडत होत्या. दागिने चोरणारी एक टोळी पोलिसांच्या हाती लागली. यानंतर या चोरट्यांकडून चोरलेले दागिने हस्तगत करण्यात देखील पोलिसांनी यश मिळविले. शिमगोत्सवाचे औचित्य साधून सात महिलांना १७ तोळ्यांचे सुमारे पाच लाखांचे दागिने परत केले आहेत.
