टीआरपी येथे पूर्व वैमनस्यातून तरुणाला रिक्षातील जॅकने मारहाण

0

रत्नागिरी : पूर्व वैमनस्यातून तरुणाला रिक्षातील जॅकने मारहाण केल्याप्रकरणी एकाविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाणीची ही घटना रविवार, २७ मार्च रोजी टीआरपी पेट्रोलपंपाजवळ दुपारी १२.२० वा. घडली होती.

सुरज वाघाटे (रा. शांतीनगर, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याविरोधात महेश श्रीपत धोत्रे (वय ३०.रा. शांतीनगर रसाळवाडी नाचणे, रत्नागिरी) यांनी तक्रार दिली आहे.

त्यानुसार, रविवारी दुपारी पूर्ववैमस्यातून सुरज वाघाटे रिक्षातील जॅक घेऊन महेश धोत्रेच्या अंगावर मारण्यासाठी धावून गेला आणि त्याच्या डाव्या हाताच्या खांद्यावर मारला. त्यानंतर पुन्हा तो जॅक त्याच्या हाताच्या अंगठ्यावर मारुन त्याला शिवीगाळ करत हातांच्या थापटांनीही मारहाण केली. याप्रकरणी महेश धोत्रे शहर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले होते. तेव्हा पोलिसांनी त्यांना प्रथम वैद्यकीय उपचारांसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते.

औषधोपचार करून झाल्यावर धोत्रे यांनी बुधवार, ३० मार्च रोजी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. अधिक तपास पोलिस हवालदार जाधव करत आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:56 AM 01-Apr-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here