रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शाळा-महाविद्यालये ३१ मार्चपर्यंत बंद

0

रत्नागिरी: करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व शाळा-महाविद्यालये येत्या ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. त्यानुसार रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शाळा बंद राहणार आहेत. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीतर्फे रा. भा. शिर्के प्रशाला, जीजीपीएस, गोदूताई जांभेकर विद्यालय, गोगटे-जोगळेकर महाविद्यालय,. अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय, भागोजीशेठ कीर विधी महाविद्यालय ही शाळा-महाविद्यालये चालविली जातात. ती सर्व ३१ मार्चपर्यंत बंद राहतील. मात्र दहावी-बारावीच्या तसेच वरिष्ठ महाविद्यालयाच्या सर्व परीक्षा वेळापत्रकानुसार होणार आहेत, तशाच होतील. १०वी-१२वी सिनीअर कॉलेजच्या परीक्षा आहेत तशा सुरू राहातील. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्ष शिल्पाताई पटवर्धन आणि कार्यवाह सतीश शेवडे यांनी हे जाहीर केले आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here