अनिल देशमुख, सचिन वाझे यांना सीबीआय आज ताब्यात घेणार

0

मुंबई : भ्रष्टाचार प्रकरणी महाराष्ट्राचे माजी मंत्री अनिल देशमुख, बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाजे तसेच कुंदन शिंदे यांना सीबीआय आज ताब्यात घेणार आहे.

न्यायालयाने केंद्रीय अन्वेषण ब्यूरो चा अर्ज स्वीकारला आहे, ज्यामध्ये महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना त्यांच्या आणि इतरांविरुद्ध दाखल झालेल्या भ्रष्टाचाराच्या गुन्ह्याची चौकशी करण्यासाठी त्यांच्या कोठडीत ठेवण्याची विनंती करण्यात आली होती.

मनी लाँड्रिंग प्रकरणात एनसीपीचे ज्येष्ठ नेते देशमुख आणि त्यांचे दोन सहकारी संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे हे सध्या अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) चौकशी करत सुरु असून ते न्यायालयीन कोठडीत आहेत. सीबीआयने अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी पी सिंघाडे यांच्यासमोर अर्ज दाखल केला.

याद्वारे, सीबीआयने मनी लाँड्रिंग प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या विशेष पीएमएलए न्यायालयाला देशमुख आणि त्यांच्या दोन साथीदारांना भ्रष्टाचार प्रकरणाचा तपास करणाऱ्या तपास अधिकाऱ्यांच्या (आयओ) कोठडीत पाठवण्याची विनंती केली होती. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गेल्या वर्षी मार्चमध्ये आरोप केला होता की, तत्कालीन गृहमंत्री देशमुख यांनी पोलीस अधिकाऱ्यांना शहरातील रेस्टॉरंट्स आणि बारमधून दरमहा १०० कोटी रुपये गोळा करण्याचे टार्गेट दिले होते. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआयने देशमुख यांच्याविरोधात एफआयआर नोंदवला होता.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:07 PM 01-Apr-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here