रत्नागिरी : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावकर यांना भारतरत्न मिळावे, यासाठी आज (१६ मार्च) दापोलीचे ग्रामस्थ प्रसाद कर्वे मुंबईत आझाद मैदानावर येथे आमरण उपोषण करणार आहेत. विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात स्वा. सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार केंद्र सरकारने द्यावा, अशी शिफारस महाराष्ट्र सरकारने करावी आणि अधिवेशनात तसा ठराव व्हावा, अशी श्री. कर्वे यांची मागणी आहे. मात्र विधानसभेचे अधिवेशन संस्थगित झाल्याने ती मागणी पूर्ण होऊ शकणार नाही. मात्र आपल्या मागणीसाठी श्री. कर्वे आजपासून आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसणार आहेत.
