कोरोना व्हायरसचं कारण मिळाल्याने कमलनाथ सरकारला दिलासा

0

मध्य प्रदेशात 9 मार्चपासून सुरू असलेलं राजकीय नाट्य विधानसभेत आजही पाहायला मिळालं. कमलनाथ सरकारची फ्लोअर टेस्ट आजही होऊ शकली नाही. उलट कोरोना व्हायरसचं कारण पुढे करत 26 मार्चपर्यंत विधान सभेचं कामकाज स्थगित करण्यात आली. दरम्यान, मुख्‍यमंत्री कमलनाथ यांनी राज्‍यपाल लालजी टंडन यांना भले मोठं पत्र लिहिलं आहे. भाजपने काँग्रेसच्या अनेक आमदारांचे अपहरण केले आहे. आमच्या आमदारांना भाजपने वेठीस ठेवलं असल्याचा आरोप मुख्यमंत्री कमलनाथ यांनी केला आहे.

HTML tutorial

एका मिनिटांत राज्यपालांनी संपवलं अभिभाषण…

सत्ताधारी काँग्रेस आणि विरोधक भाजपच्या आमदारांच्या गदारोळात राज्यपाल लालजी टंडन यांनी एका मिनिटांत आपलं अभिभाषण संपवलं. राज्यपालांच्या अभिभाषणानं सभागृहाचं कामकाज सुरु झालं. सगळ्यांनी संविधान आणि परंपरेचं पालन करायला हवे. मध्य प्रदेशाच्या गौरवशाली परंपरेचं संरक्षण करायला हवं. कोरोना व्हायरसचं कारण केलं पुढे करत राज्यपालांनी विधानसभेचं 26 मार्चपर्यंत कामकाज स्थगित करण्यात आलं आहे. दरम्यान, मुख्यमंत्री कमलनाथ यांनी जवळपास 6 पानांचं पत्र राज्यपालांना लिहिलं आहे. भाजपने काँग्रेसच्या अनेक आमदारांना बेठीस धरले आहे. कर्नाटक पोलिसांना त्यांच्यावर पहारा देण्याचे आदेश दिले आहेत. एवढंच नाही तर काँग्रेसच्या आमदारांना वेगवेगळं वक्तव्य करण्यात भाग पाडले जात आहे. भाजपने नजरकैदेत ठेवलेल्या आपल्या आमदारांना फ्लोअर टेस्टसाठी सोडावं असं, आवाहनही कमलनाथ यांनी या पत्राद्वारे केलं आहे. आमदारांच्या फोडाफोडीचं राजकारण टाळण्यासाठी सर्व आमदारांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं होतं. त्यामुळे आज फ्लोअर टेस्ट होणार की नाही याबाबत अद्यापही सस्पेन्स निर्माण झाला होता. तर आमच्याकडे बहुमत आहे, असा दावा मुख्यमंत्री कमलनाथ यांनी केला आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्यासह 22 आमदारांनीही राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द केला. त्यानंतर कमलनाथ सरकार कोसळेल असा अंदाज सर्व स्तरातून व्यक्त केला जात होता. कमलनाथ यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी सोमवारपर्यंतची वेळ देण्यात आली होती. सोमवारी सकाळी 11 वाजता फ्लोअर टेस्ट होईल असं सांगण्यात येत होतं. मात्र विधिमंडळाकडून आलेल्या परिपत्रकानुसार त्यामध्ये प्लोअर टेस्टचा उल्लेख नसल्यानं ही चाचणी होणार की नाही याबाबत संभ्रम कायम आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here