बेरोजगार-स्वयंरोजगार संघाच्या अध्यक्षपदी राकेश साळवींची निवड

0

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा बेरोजगार व स्वयंरोजगार सहकारी संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत फणसोपच्या राकेश साळवी यांची अध्यक्षपदी निवड झाली.

हा संघ स्वयंरोजगार व बेरोजगार संस्थांना शासकीय कामे मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतो. त्यामुळे अशा संस्थानी संघाचे सभासद व्हावे, असे आवाहन नूतन अध्यक्षांनी निवड जाहीर झाल्यानंतर केले आहे.

संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मधुकर टिळेकर, आमरेश पावसकर, समीर झारी, अभिजित तेली, राजेश मापुसकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी भाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here