”यूपीए-2 च्या नेतृत्वासाठी ममता बॅनर्जीच योग्य”

0

मुंबई : यूपीएचं नेतृत्व बदलायचं असेल तर ममता बॅनर्जींशिवाय दुसरी कोणतीही योग्य व्यक्ती दिसत नाही असं मत प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केलं आहे.

यूपीएचं नेतृत्त्व शरद पवारांकडे सोपवावं अशी चर्चा सुरु असताना प्रकाश आंबेडकरांनी ममता बॅनर्जींना कौल दिला आहे.

गेल्या काही काळापासून ही चर्चा सुरु आहे की ‘यूपीए’चं अध्यक्षपद कोणाकडे जायला हवं? शरद पवार यांचं नाव त्यासाठी सतत घेतलं जात आहे. परंतु गेल्या काही दिवसात शरद पवारांच्या नाव आता जाहीरपणे घेतले जात आहे. यावर प्रकाश आंबेडकरांनी प्रतिक्रिया दिली आहे. ममतांशिवाय यूपीएला इतर विश्वासार्ह पर्याय नाही, अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकरांनी दिली आहे.

सतीश उके यांच्यावरील कारवाई बेकायदेशीर
कोट्यावधींचा भूखंड बळकावत आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी नागपूरमधील वकील सतीश उके यांच्या विरोधात झालेली कारवाई बेकायदेशीर आहे. ही कारवाई राजकीय सुडापोटी केली गेली आहे. जर 1.2 एकर जागेसाठी ईडी तपास करणार असेल तर मग ईडी या विशेष यंत्रणेची फायदा दर्जा काय राहतो. या कारवाई विरोधात बार काउन्सिलने आवाज उठवला पाहिजे

काश्मीर फाईल्स चित्रपटावर प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया
सध्या काश्मीर फाईल्स या चित्रपटाबद्दल सगळीकडे चर्चा सुरू आहे. इतिहासकारांनी देखील या प्रतिक्रिया द्यावी. म्हणजे खरं काय आणि खोटं काय हे कळणार आहे. काश्मीरमध्ये आता ही इतर हिंदू राहता आहे. मग ते का नाही सोडून आले फक्त काश्मीरी पंडित का? या बद्दल माहिती द्यावी असे देखील प्रकाश आंबेडकर म्हणाले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:46 PM 02-Apr-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here