आरटीई प्रवेशासाठी रत्नागिरी जिल्ह्यात यंदा ९१४ जागा

0

रत्नागिरी : आरटीई प्रवेशासाठी जिल्ह्यात यंदा ९१४ जागा उपलब्ध आहेत. यासाठी १ हजार ३८ पालकांनी नोंदणी केली आहे. सोडतीत आपला क्रमांक लागला आहे की नाही, याचीही माहिती सोमवारपासून दि. ४ एप्रिल २०२२ पासून दिली जाणार आहे.

शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत दिल्या जाणाऱ्या २५ टक्के प्रवेशांसाठी राज्यात १ लाख १ हजार ९७७ जागा उपलब्ध होणार आहेत. या जागांसाठी राज्यभरात एकूण २ लाख ८२ हजार ७७८ अर्ज दाखल झाले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील ९४ शाळांमध्ये ९१४ जागांसाठी १ हजार ३८ अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे यंदा प्रवेशासाठी मोठी चुरस असल्याचे स्पष्ट झाले.

सोमवारपासून पालकांसाठी आरटीई प्रवेशांची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यातून सर्व माहिती मिळण्यास मदत होणार आहे.

आरटीई प्रवेशांसाठीची या शैक्षणिक वर्षाची सोडत बुधवारी जाहीर करण्यात आली. प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक दिनकर टेमकर यांनी ही सोडत जाहीर केली. सोडतीत आपला क्रमांक लागला आहे की नाही याची माहिती येत्या सोमवारपासून दिली जाणार आहे.

सोडतीमध्ये प्रवेश निश्चित झालेल्या पालकांना त्यानंतर एसएमएसद्वारे सूचित करण्यात येणार आहे. मंगळवारपासून प्रवेश निश्चित झालेल्या पालकांना प्रवेश घेण्यासाठी येईल. याची संबंधित विद्यार्थी आणि पालकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:59 PM 04-Apr-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here