लांजा बालिका मृत्यूप्रकरण: हलगर्जीपणामुळे दोघींविरुद्ध गुन्हा दाखल

0

रत्नागिरी : अडीच महिन्यांच्या बालिकेच्या मृत्यूप्रकरणी लांजा येथील अक्काताई तेंडुलकर महिलाश्रमातील दोघींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लांजा महिलाश्रमातील दत्तकग्रहण केंद्रात ठेवलेल्या अडीच महिन्यांच्या बालिकेला या केंद्रातील मनोविकृत बालकाने पाळण्यातून बाहेर काढून तिचा हात पिरगळून तिला लादीवर आपटल्याने तिचा मृत्यू झाला होता. दत्तकग्रहण केंद्राच्या अधीक्षिका सुरेखा बिजितकर तसेच संगीता पवार काळजीवाहक म्हणून काम करीत होत्या. काळजीवाहक असलेल्या पवार कर्णबधिर असल्याने हा प्रकार घडला, त्यावेळी त्यांना कोणताही आवाज ऐकू आला नाही. त्यामुळे या घटनेत त्या छोट्या बालिकेचा मृत्यू झाला. लांजा पोलिसांनी याबाबत या दोघींविरुद्ध हलगर्जीपणा केल्याबद्दल गुन्हा नोंदविला आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here