आंबव पोंक्षे गावात ग्रामपंचायतच्या माध्यमातून मोफत गोळ्या वाटप

0

माखजन : संगमेश्वर तालुक्यातील आंबव पोंक्षे गावात ग्रामपंचायतीने पुढाकार घेत रक्तदाब, मधुमेह या आजारावरच्या गोळ्यांचे मोफत वाटप केले. या गोळ्या लाभार्थीना यापुढे शासकीय योजनेतून मोफत सुरू राहणार आहेत. दरम्यान यावेळी माखजन प्राथमिक आरोग्य केंद्राचे पथक उपस्थित होते. माखजन प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ प्रदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य पथकाने काम केले.

आंबव पोंक्षे ग्रामपंचायतीत उपस्थित लाभार्थ्यांचा मधुमेह चाचणी व रक्तदाब तपासणी करून आधी चालू असलेल्या गोळ्यांची खात्री करण्यात आली व गोळ्या शासकीय योजनेतून मोफत सुरू करण्यात आल्या.

यावेळी आरोग्य विभागाकडून समुदाय आरोग्य अधिकारी गणेश चाटे, बालाजी फड, युवराज देशमुख, आरोग्य सेविका सौ सरिता चिले, आशा सेविका सौ रुपाली कुडतडकर, मदतनीस सौ शामल जाधव, आंबव पोंक्षे सरपंच सौ प्रिया सुवरे, उपसरपंच शेखर उकार्डे, ग्रा.पं सदस्य सौ निधी भायजे, सौ विद्या पकडे, सौ दीपाली कुडतडकर, सौ स्मिता सुतार, मंगेश मांडवकर, संजय भुवड, ग्रामसेवक व्ही एम दडस, अनघा नेटके, शरद जाधव आदी उपस्थित होते. या शिबिराचा लाभ १०० हुन अधिक लाभार्थ्यांनी घेतला.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:26 PM 04-Apr-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here