दहशतवादी हल्‍ल्‍याच्या पार्श्वभूमीवर अमरनाथ यात्रेला स्थगिती

0

श्रीनगर : अमरनाथ यात्रेवर दहशतवादी हल्‍ल्‍याच्या शक्‍यतेच्या पार्श्वभूमीवर जम्‍मू काश्मीर सरकारने अमरनाथ यात्रा तुर्तास थांबवली आहे. तसेच पर्यटकांसाठी एक ॲडव्हायजरी लागू केली असून, त्‍यामध्ये सरकारने यात्रेकरू आणि पर्यटकांना काश्मीर खोर्‍यातील आपला थांबण्याचा तसेच यात्रेचा अवधी कमी करण्यास सांगितले आहे. इतकेच नाही तर, जितक्‍या लवकर काश्मीर खोर्‍यातून बाहेर पडता येईल तितक्‍या लवकर बाहेर पडण्यासाठी सांगण्यात आले आहे. जम्‍मू काश्मीर सरकारच्या गृहविभागाकडून  ॲडव्हायजरीमध्ये जारी करण्यात आली आहे. त्‍यानुसार अमरनाथ यात्रेवर दहशतवादी हल्‍ल्‍याची शक्‍यता आहे. त्‍यामुळे अमरनाथ यात्रेकरू आणि पर्यटकांच्या सुरक्षेसाठी खोर्‍यात सर्व यात्रा रोखण्यात आल्‍या आहेत. तसेच यात्रेकरूना लवकरात लवकर आपली यात्रा संपवून खोर्‍यातून बाहेर पडण्यास सांगण्यात आले आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here