येस बँक प्रकरणी अनिल अंबानी यांना ईडीची नोटीस

0

येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांच्यासह काही जणांच्याविरोधात मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाचा तपास करणाऱ्या सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) रिलायन्स समूहाचे अध्यक्ष अनिल अंबानी यांना समन्स बजावला आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी याबाबत माहिती दिली. आर्थिक संकटात सापडलेल्या येस बँकेकडून मोठ्या प्रमाणात कर्ज घेणाऱ्या कंपन्यांमध्ये रिलायन्स कंपनीचा देखील समावेश आहे. याच प्रकरणी अंबानी यांना नोटीस बजावण्यात आलीय. यासंदर्भात अनिल अंबानी यांना सोमवारी मुंबई येथील ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. परंतु, प्रकृती अस्वास्थ्यामुळ अनिल अंबानी चौकशीसाठी गैरहजर राहिले. त्यामुळे ईडीकडून त्यांना चौकशीसाठी नवीन तारिख देण्यात आली आहे. रिलायन्स समूहाच्या कंपन्यांनी येस बँकेकडून जवळपास 12 हजार 800 कोटींचे कर्ज घेतले होते. ते त्यांनी परत केले नाही. येस बँकेच्या कर्जाचा परतावा करू न शकलेल्या सर्व मोठ्या कंपन्यांच्या प्रवर्तकांना चौकशीसाठी बोलवण्यात आल्याचे ईडीच्या अधिका-यांनी सांगितले आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here