हेल्मेट मुक्ती केल्याबद्दल रत्नागिरी शहर व्यापारी महासंघाने मानले ना. उदय सामंतांचे आभार

0

◼️ व्यापारी महासंघाने पेढे वाटून केला आनंद व्यक्त

रत्नागिरी : रत्नागिरी सारख्या छोट्या शहरात केलेल्या हेल्मेट सक्तीचा परिणाम येथील बाजारपेठेवर झाला होता. दुकानात येणाऱ्या ग्राहकाने स्वतःजवळचे सामान सांभाळायचे कि हेल्मेट ? हा मोठा प्रश्न होता. यामुळे दुचाकीवरून बाजारात येणाऱ्या ग्राहकांची संख्या कमालीची रोडावली होती. स्थानिक दुकानदारांवर याचा मोठा परिणाम होत होता.

शिवाय कडक उन्हाळा व पावसाळ्यात देखील शहरात हेल्मेट वापरणे अडचणीचे ठरत होते. अनेकांना या हेल्मेटमुळे मानेची दुखणी देखील झाली होती. रत्नागिरी शहर व्यापारी महासंघाने हेल्मेट सक्ती हटवावी अशी मागणी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली.

त्यांनी या मागणीला न्याय देत जिल्हाधिकारी, आर टी ओ आणि वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावली व पुण्याच्या जिल्हाधिकार्यांनी घेतलेल्या निर्णयाप्रमाणे परिपत्रक काढण्याच्या सूचना जिल्हाधिकार्यांना केल्या.

यानुसार जिल्हाधिकारी यांनी परिपत्रक काढले. प्रथम प्रबोधन करावे व मग सक्ती करावी अशा सूचना ना. सामंत यांनी प्रशासनाला केल्या. आता यानुसार शहरात अंमलबजावणी सुरु झाली आहे. ना. सामंत यांनी नागरिकांची हि मागणी मान्य केल्याने मोठ्या संखेने नागरिकांनी एकत्र येत शासकीय विश्रामगृहात त्यांचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत केले.

यावेळी रत्नागिरी शहर व्यापारी महासंघाने याबाबत ना. सामंतांचे आभार मानून पेढे वाटून आपला आनंद व्यक्त केला.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:30 PM 04-Apr-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here