कोरोनाची भीती दूर करण्यासाठी रत्नागिरीत अनोखा प्रयोग; प्रयोगाला अनेकांची झुंबड

0

रत्नागिरी: चिकनमुळे कोरोना होतो, ही अफवा असल्याचे पशु विभागाकडूनच नव्हे तर आरोग्य विभागानेही स्पष्ट केले आहे. नागरिकांमधील भिती दूर करण्याच्या हेतूने रत्नागिरीतील शिवभोजन थाळीचे केंद्र असलेल्या मंगला हॉटेलमध्ये दहा रुपयात चिकन थाळी देण्यात आली. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कोरोनामुळे पोल्ट्री व्यावसायाला फटका बसला आहे. चिकन खल्ल्यामुळे कोरोना होत नाही, हे सांगण्यासाठी रत्नागिरीत अनोखी शक्कल लढवण्यात आली. शिवभोजन थाळी दहा रुपयांत सर्वसामान्यांना उपलब्ध करून देण्यात येते. शिवभोजन थाळीतून रविवारी चिकन करी आणि चिकन मसाला असे पदार्थ दिले गेले. दरम्यान, चिकन खाल्यामुळे कोरोना होतो, हा गैरसमज दूर करण्यासाठी हा प्रयोग केला. चिकन, चपाती, भात आणि रस्सा असे थाळीत दिले गेले आहे. यादिवशी १९० लोकांनी चिकनचा लाभ घेतला, असे गणेश धुरी म्हणाले. तसेच दर बुधवारी, शुक्रवारी आणि रविवारी आता शिवभोजन थाळीत शाहकारी सोबत चिकन देखील दिल जाणार आहे शिवभोजन थाळीच्या दरात म्हणजे दहा रुपयाच्या दरात हि चिकनची डिश देण्यात येणार आहे. चिकन खाल्याने कोरोना होत नाही, हे सांगण्यासाठी उपक्रम केला गेला आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here