चिपळूणमध्ये लोकवस्तीत शिरली महाकाय मगर

0

चिपळूण : चिपळूण शहराजवळ शंकरवाडी येथील नागरी वस्तीमध्ये रविवारी पहाटे 3 वाजण्याच्या 12 फूटांची अजस्त्र मगर आढळून आल्याची माहिती वन विभागास मिळाली. वन विभागाच्या रेस्क्यू पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत मगर पिंजऱ्यात बंदिस्त केली आणि तिची सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात मुक्तता केली आहे.

हे रेस्क्यू ऑपरेशन विभागीय वन अधिकारी दिपक खाडे, सहायक वनसंरक्षक सचिन निलख, वनपरिक्षेत्र अधिकारी चिपळूण राजेश्री कीर यांच्या मार्गदशनाखाली वनरक्षक सुर्वे, वनपाल रामदास खोत व वाहनचालक नंदू कदम यांनी यशस्वीरित्या पूर्ण केले.

बंदिस्त करण्यात आलेली मगर 12 फूट लांब व अंदाजे 300 किलोग्रॅम वजनाची असून ती मादी जातीची होती. तिचे वय अंदाजे 34 ते 40 वर्षे असावे, असे वन विभागाचे रेस्क्यू पथकाने सांगितले आहे.

शंकरवाडी येथील लोकवस्तीमध्ये पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास नागरी वस्तीत अजस्त्र मगरीला सुरक्षित पकडल्याने वन विभागाने दाखविलेल्या कार्यतत्परतेने मोठा अनर्थ टळला आहे. त्यामुळे परिसरातील लोकांनी वन विभागाचे व रेस्क्यू पथकामधील अधिकारी कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:11 AM 05-Apr-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here