विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची साडेतीन तास चौकशी

0

मुंबई : मुंबई बँक बोगस मजूर प्रकरणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात सोमवारी साडेतीन तास चौकशी करत पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदविला.

आवश्यकता भासल्यास त्यांना पुन्हा चौकशीसाठी बोलावणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. मुंबई बँकेच्या मजूर प्रवर्गातून निवडणूक लढवून कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा दरेकर यांच्यावर आरोप आहे. आम आदमी पक्षाचे धनंजय शिंदे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. सकाळी ११ वाजेच्या सुमारास दरेकर चौकशीसाठी आले. त्यांच्याकडे काही कागदपत्रांची मागणी केली आहे. तसेच मजूर असल्याचे पुरावेदेखील मागण्यात आल्याचे समजते.

चौकशीत पोलिसांनी तेच तेच प्रश्न विचारून भंडावून सोडण्याचा प्रयत्न केला. अनेक नियमबाह्य प्रश्नही विचारले गेले. स्वत: पोलीस आयुक्तच चौकशीवर नजर ठेवून असल्याने, अधिकाऱ्यांवर राज्य सरकारचा दबाव होता, हे स्पष्ट जाणवत होते. पोलिसांना सर्व प्रकारचे सहकार्य करणार आहे, असे प्रवीण दरेकर, विरोधी पक्षनेते, विधान परिषद यांनी सांगितले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:16 AM 05-Apr-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here