कोणत्याही दबावाला बळी न पडता सचिन नारकर यांच्या अपघाताचा तपास करावा – जैतापूरवासिय

0

राजापूर : पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते सचिन नारकर यांचा झालेला अपघाती मृत्यू हा अपघात नसून घातपात आहे. त्यामुळे कोणत्याही दबावाखाली न येता पोलिसांनी त्या दृष्टीने तपास करावा अशी मागणी जैतापूरवासियांकडून सचिन नारकर यांना श्रद्धांजली वाहण्याच्या निमित्ताने करण्यात आली आहे. रविवारी जैतापूर हायस्कूल येथे झालेल्या शोकसभेनंतर सर्वांनी नाटे पोलीस स्टेशन येथे जाऊन अधिकाऱ्यांची भेट घेतली. नारकर यांच्या मृत्यूला दहा दिवसाचा कालावधी उलटून देखील तपासात काहीच निष्पन्न झाले नाही की काय असा सवाल अनेकांनी उपस्थित करून सागरी पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप काळे यांच्याशी सविस्तर चर्चा केली. सचिन नारकर यांचे नातेवाईक, मित्रपरिवार आणि ग्रामस्थ यांच्या भावना तीव्र असून सचिन नारकर याच्या मृत्यूचा घटना पाहता हा अपघात नसून घातपात आहे. त्यामुळे कोणत्याही दबावाखाली न येता आपण त्या दृष्टीने तपास करावा अशी मागणी केली.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here