घरडा कंपनीतर्फे दिव्यांगांसाठीचे आयोजित शिबिर तात्पुरते स्थगित

0

खेड तालुक्यातील घरडा कंपनीच्या वतीने सामाजिक दायित्व उपक्रमांतर्गत दिव्यांग व्यक्तींसाठी मोफत तपासणी शिबिर रतनबाई घरडा हॉस्पिटल, लवेल येथे दि. २० मार्च रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत आयोजित करण्यात आले होते. मात्र सरकारी निर्देशानुसार, शिबिर रद्द करण्यात आले आहे. परंतु, आगामी कालावधीत शिबिराचे पुन्हा नियोजन भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम (अल्मीको) व समाजकल्याण विभाग रत्नागिरी यांच्या सहकार्याने करण्यात येईल, अशी माहिती कंपनीतर्फे संदीप निमसे यांनी दिली. नियोजित तारीख लवकरच कळविण्यात येईल, असे आयोजकांनी सांगितले. दरम्यान, आगामी होणाऱ्या शिबिराचा लाभ घेण्यासाठी दिव्यांगांनी आधारकार्ड, ४० टक्के पेक्षा जास्त अपंगत्व असल्याचे प्रमाणपत्र, रेशनकार्ड, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, दोन फोटो तयार ठेवावेत, असे आवाहन केले आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here