देवरुख मार्लेश्वर मार्गाचे डांबरीकरण न झाल्यास १४ एप्रिल रोजी उपोषण

0

देवरुख : मार्लेश्वर तिठा येथे देवरुख मार्लेश्वर रस्त्याच्या कामात होत असलेल्या दिरंगाईबाबत बांधकाम विभागाचे लक्ष वेधून घेण्यासाठी १४ एप्रिल रोजी उपोषण छेडण्यात येणार असल्या बाबतचे निवेदन भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष रुपेश कदम यांनी सोमवार दिनांक ४ एप्रिल रोजी बांधकाम विभागाकडे सादर केले आहे.

यावर बांधकाम विभाग कोणती भूमिका घेते याकडे ग्रामस्थ, भक्तगण व वाहनचालकांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.
सह्याद्रीचे कडेकपारीत मारळ नगरीत प्रसिद्ध श्री क्षेत्र मार्लेश्वर देवस्थान वसलेले आहे. शंभू देवाच्या दर्शनासाठी जाताना जो मार्ग आहे त्या मार्गाची चाळण झाली आहे. अनेक ठिकाणी मोठमोठेले खड्डे पडले आहेत. खडी पसरली आहे यामुळे वाहन घसरून अपघात होण्याची दाट शक्यता आहे. या मार्गावरून वाहनांची सतत वर्दळ असते. तसेच आंगवली दशक्रोशीतील विद्यार्थी, ग्रामस्थ नोकरदार, हे कामानिमित्त दररोज देवरुख या ठिकाणी येतात. देवरुख मार्लेश्वर मार्गाची दुरावस्था झाल्याने वाहन चालक, विद्यार्थी यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

या मार्गाचे डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी वारंवार ग्रामस्थांमधून होत आहे. ग्रामस्थ, वाहनचालकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष रुपेश कदम यांनी यापूर्वी बांधकाम विभागाला निवेदन सादर केले होते . शिष्टमंडळाने ही अधिकार्‍यांची भेट घेतली होती. या भेटी अंतर्गत झालेल्या चर्चेनुसार बांधकाम विभागाने अद्याप कोणतीही हालचाल केलेली नाही. या समस्येकडे बांधकाम विभागाचे लक्ष वेधून घेण्यासाठी रुपेश कदम पुढे सरसावले आहेत. देवरुख ते मार्लेश्वर मार्गचे डांबरीकरण करण्यात यावे अन्यथा १४ एप्रिल रोजी मार्लेश्वर दशक्रोशीतील ग्रामस्थां समवेत मार्लेश्वर तिठा येथे उपोषण छेडण्यात येईल असा इशारा रुपेश कदम यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन रुपेश कदम यांनी सोमवार दिनांक ४ एप्रिल रोजी बांधकाम विभागाकडे सादर केले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:50 PM 05-Apr-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here