‘जोतिबाच्या नावानं चांगभलं’च्या जयघोषात खेट्यांची सांगता

0

रत्नागिरी शहरातील पेठकिल्ला येथील पुरातन श्री जोतिबा मंदिरात श्री जोतिबाच्या खेट्यांची सांगता रविवारी झाली. ‘जोतिबाच्या नावानं चांगभलं’च्या जयघोषात भाविकांनी रांगा लावून देवाचे दर्शन घेतले. १६ फेब्रुवारीला जोतिबाच्या पहिल्या खेट्याला सुरवात झाली होती. शेवटचा म्हणजे पाचवा खेटा १५ मार्चला झाला. यानिमित्त रत्नागिरीसह चिपळूण, संगमेश्वर, लांजा, देवरूख, कोल्हापूर, कराड, पुणे, सातारा आदी भागातील भाविकांनी जोतिबाचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. जोतिबाच्या नावाचा जयघोष करीत दिवसभरात हजारो भाविकांनी रांगेत उभे राहून दर्शन घेतले. भाविकांना शिऱ्याचा प्रसाद वाटण्यात आला.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here