‘सर’ या उपाधीने मला अवघडल्यासारखे वाटते – रवींद्र जाडेजा

0

क्रिकेट या खेळाने मला खरी ओळख दिलंय, प्रेम दिलंय. त्यामुळे क्रिकेटचं माझे जीवन बनून राहिलेय. इंग्लंडमधील चमकदार खेळानंतर तत्कालीन कर्णधार महेंद्रसिंह धोनीने माझ्या नावापुढे ‘सर’ उपाधी लावली. तेव्हापासून मला सर्व त्याच नावाने हाक मारू लागले आहेत. पण त्यांच्या त्या हाकेत मला पूर्वीसारखा आपलेपणा जाणवत नाहीय,अशी खंत टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू क्रिकेटपटू रवींद्र जाडेजा याने एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केली आहे. अनेकदा टीम इंडियाला संकटातुन बाहेर काढून विजयपथावर नेणारा रवींद्र जाडेजा म्हणतो, मला कुणी सर म्हणून हाक मारली कि अवघडल्यासारखे वाटते. त्यापेक्षा जाडू,अथवा जड्डू हि हाक अतिशय जवळची वाटते.माजी कर्णधार माहीने ट्विट केलेली ‘सर’ हि उपाधी मला अस्वस्थ करून टाकतेय. कारण देशाच्या क्रिकेटशौकिनांनी मला भरभरून प्रेम दिलंय. त्यांच्या शुभेच्छांमुळेच मी जामनगरसारख्या छोट्या शहरातून येऊन क्रिकेटजगतात लोकप्रिय झालोय. मला सर या नावापेक्षा लोकांनी जाडू किंवा जड्डू याच नावाने बोलवावे असे सतत वाटते. कारण त्या हाकेत एक आपलेपणाचा ओलावा असतो.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here