लांजा महाविद्यालयाचे हिंदी विभाग प्रमुख डॉ. सुनील चव्हाण यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

0

लांजा : लांजा कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाचे हिंदी विभाग प्रमुख डॉ. सुनील चव्हाण यांना लांजा तहसिल हिंदी अध्यापक संघटनेच्यावतीने या यावर्षीच्या आदर्श शिक्षक पुरस्कार आणि मानपत्र देऊन मंगळवारी पाच एप्रिल रोजी गौरवण्यात आले.

लांजा शहरातील अलअमिन उर्दू हायस्कूल या ठिकाणी सदरचा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून लांजा न्यू एज्युकेशन सोसायटीचे संचालक महंम्मद रखांगी हे उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद कोकण विभाग अध्यक्ष रवींद्र इनामदार हे होते .तसेच व्यासपीठावर लांजा तालुका हिंदी अध्यापक संघटनेचे अध्यक्ष भीमराव खोत, लांजा महाविद्यालयाचे प्राचार्य अरविंद कुलकर्णी, कोषाध्यक्ष अजित साळवी, अल अमिन उर्दू हायस्कूलचे मुख्याध्यापक महम्मद सय्यद आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमाप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर सुनील चव्हाण यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरवण्यात आले याबरोबरच मानपत्र देखील देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना महंमद रखांगी यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात हिंदी भाषेतून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक विकास साधला गेला होता. आता पुन्हा एकदा या हिंदी भाषेतून शिक्षण, राष्ट्रीय एकात्मतेचे बरोबरच नैतिकतेचे धडे दिले पाहिजेत असे मत व्यक्त केले.

प्रास्ताविक भीमराव खोत यांनी केले. सत्काराला उत्तर देताना डॉ. सुनील चव्हाण यांनी आपल्या जडणघडणीत आपले आई-वडील, गुरुजन यांच्याबरोबरच महंमद रखांगी यांचा देखील आपल्यावर विशेष प्रभाव असल्याचे त्यांनी नमूद करताना आपल्याला पुरस्कार देऊन गौरविले बद्दल त्यांनी हिंदी अध्यापक संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रांति करंबेळे आणि प्रिया भागवत यांनी केले तर आभार उर्दू हायस्कूलचे शिक्षक शहनवाज जमादार यांनी मानले .कार्यक्रमाला हिंदी अध्यापक संघटनेचे कोषाध्यक्ष अजित साळवी, उर्दू हायस्कूलचे मुख्याध्यापक महम्मद सय्यद तसेच अशोक कदम, भारत मणिकेरी आदी उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:58 PM 06-Apr-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here