ओणी येथे राष्ट्र सेवा दलाच्या शिबिरांचे आयोजन

0

राजापूर : राष्ट्र सेवा दलाच्या ओणी (ता. राजापूर) शाखेतर्फे दस्तनायक आणि समाजभान युवा शिबिर अशी दोन शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. येत्या २३ ते ३० एप्रिल या कालावधीत ही शिबिरे होणार आहेत.

गेली कित्येक वर्षे राष्ट्र सेवा दल शिबिराच्या माध्यमातून समाजातील असंख्य मुलांचे संस्कारमय जीवन घडविण्याचे काम अतिशय तळमळीने सातत्याने करीत आहे. युवा पिढीला सुंदर विचारधारेच्या माध्यमातून एकत्र जोडू शकलो, तर त्याचा आनंद आणि समाधान अधिक असेल. त्याकरिता शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मुलांना, त्यांच्या कलागुणांना वाव देऊन कला, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक अशा वैचारिक पातळीवर मुक्तपणे वावरण्यासाठी निवासी शिबिराचे आयोजन केले आहे. मुलांना या शिबिरांत सहभागी करून त्यांना मुक्तपणे छंद जोपासण्यास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. शिबिरांना मुक्तपणे प्रवेश दिला जाणार आहे. राष्ट्र सेवा दल ओणी केंद्र, ओणी पंचक्रोशी शिक्षण मंडळ, सर्वोत्कर्ष सामाजिक संस्था, वात्सल्य मंदिर आणि कमल मोहन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने ही शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत.

दोन्ही शिबिरे ओणी (ता. राजापूर) येथील नूतन विद्यामंदिरात होणार आहेत. शिबिरांचा तपशील असा – दस्तनायक शिबिर (वयोगट ६ ते १६) – २३ ते २७ एप्रिल २०२२. विषय आणि मार्गदर्शक – १. सेवा दलाची पंचतत्वे – (नितीन मुझुमदार), २. माझे दैवत सावित्रीबाई, महात्मा फुले (सुनील कोंडकर), ३. शिवाजी कोण होता ? (बी. के. गोंडाळ), ४. अंधश्रद्धा – (विनोद वायंगणकर), ५. सर्पांच्या दुनियेत (विलास कोळपे), ६. सर्वधर्म समभाव (प्रशांत दांडेकर), ७. वाचन – लेखन एक छंद (वासुदेव तुळसणकर), ८. राष्ट्र सेवा दलाची नीतिमूल्ये आणि शिकवण (बाबासाहेब नदाफ).

समाजभान युवा शिबिर (वयोगट १६ ते २५) – २७ ते ३० एप्रिल २०२२. उद्घाटक नितीन वैद्य (राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्र सेवा दल), विषय – १. भारतीय संविधान (बाबासाहेब नदाफ), २. ग्रेटभेट (राहुल भोसले, कोल्हापूर), ३. लिंगभाव समानता (प्रा. लक्ष्मी यादव), ४. तरुण मुलांमधील नैराश्य आणि व्यसनाधीनता (रविदर्शन कुलकर्णी), ५. लैंगिकता शिक्षण – युवकांची भूमिका (सचिन आशा सुभाष), ६. ग्रेटभेट (डॉ. प्रियांका कांबळे), ७. प्रेम, मैत्री, आकर्षण (प्रा. लक्ष्मी यादव), ८. कोकणातील पाण्याचे नियोजन – नाम फाऊंडेशन (रोहित सावंत), ९. अंधश्रद्धांच्या बेड्या तोडताना (सरिता चव्हाण), १०. ग्रेटभेट (दिशा पिंकी शेख), ११. महापुरुषांची ओळख (बाबासाहेब नदाफ).

अधिकाधिक मुलांनी आणि तरुणांनी आपापल्या शिबिरांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन निमंत्रक डॉ. महेंद्र मोहन (अध्यक्ष, वात्सल्य मंदिर, ओणी, 09423804927, 09284746554), नितीन मुझुमदार (सचिव, वात्सल्य मंदिर, ओणी, 08668365623), आलोक मोहन (शिबिर संचालक, 09096505960), सहनिमंत्रक्र बी. के. गोंडाळ (साहाय्यक शिक्षक, जुवाठी, 09529980077), सरिता चव्हाण (कवयित्री – सामाजिक कार्यकर्त्या, 09604655844, 09403296694), महेशकुमार एन. एन. के (माजी विद्यार्थी – वात्सल्य मंदिर, ओणी, 09763572015, 09284321751) यांनी केले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:01 PM 06-Apr-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here