‘आता हातावर लागणार निळ्या शाईचा शिक्का’ ; खबरदारीसाठी राज्य सरकारचा निर्णय

0

राज्यात कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळल्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. आतापर्यंत राज्यात कोरोनाचे 38 जण रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी राज्य सरकारकडून सर्व स्तरावर उपाययोजना करण्यात येत आहेत. तसेच आता घरी क्वॉरेंटाईन केलेल्या लोकांच्या हातावर शिक्का मारण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केले आहे. राजेश टोपे यांनी सांगितले की, कोरोना व्हायरसची बाधा झालेल्या देशांमधून आलेल्या लोकांना A, B, C अशा कॅटॅगरीमध्ये ठेवले जाणार आहे. A म्हणजे ज्यांच्यात लक्षण आहे त्यांना वेगळं ठेवलं जाणार. B मध्ये वयोवृद्ध आहे ज्यांना डायबिटीस, हायपर टेन्शन आहे त्यांना पण 14 दिवस क्वॉरेंटाईनमध्ये ठेवण्यात येईल. 14 दिवस लक्षणं आढळली नाहीत तर ट्रीटमेंट होणार नाही. C मध्ये लक्षण नाही त्यांना घरी क्वॉरेंटाईन करणार असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. तसेच घरी क्वॉरेंटाईन केलेल्या लोकांच्या हातावर निवडणुकीच्या शाईप्रमाणे शिक्का मारण्यात येईल. जेणकरुन घरी क्वॉरेंटाईन केलेले लोकं जर बाहेर दिसले तर बाहेरील लोकांना समजेल की अशा व्यक्तींना घरी क्वॉरेंटाईन करण्यात आले आहे.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here