रत्नागिरी शहर बसस्थानकासाठी रेडी मिक्स काँक्रीट पुरवण्याच्या नवलाई ग्रुपच्या कामाचा शुभारंभ संपन्न

0

रत्नागिरी शहर आणि परिसरासाठी अत्यंत उपयुक्त ठरणाऱ्या रत्नागिरी शहर बसस्थानकाच्या बांधकामात आता नवलाई ग्रुपने मोलाचा व महत्वाचा वाटा उचलला आहे. बसस्थानकाच्या बांधकामाला रेडी मिक्स काँक्रीट पुरवण्याचा शुभारंभ नवलाई ग्रुपने केला असून हे काम दर्जेदार व वेगवान होईल याबद्दल कोणतीही शंका नाही. रत्नागिरी शहर बसस्थानकाच्या बांधकामाला रेडी मिक्स काँक्रीट पुरवणे हा व्यावसायिक भाग असला तरीही काम मात्र घरचं असल्याच्या भावनेनेच व्हायला हवं अशा सूचना राजू सावंत यांनी या शुभारंभप्रसंगी आपल्या नवलाई ग्रुपच्या कर्मचाऱ्यांना केल्या. एसटीशी असलेले आपले जुने ऋणानुबंध व्यक्त करताना नवलाई ग्रुपचे राजू सावंत भावनिक झाले. सावंत बंधूंचे वडील कै. विनायकराव सावंत यांनी ३६ वर्षं एसटीत वाहक म्हणून सेवा बजावल्यामुळे एसटीशी आपला घरोब्याचा संबंध असल्याचे त्यांनी सांगितले. वडिलांचा डबा पोहचवण्यासाठी ज्या वास्तूत आपण वारंवार आलो आणि ज्या महामंडळाच्या जीवावर आपलं घर चाललं त्यासाठी आज आपण काहीतरी करत आहोत ही कृतार्थतेची भावना राजू सावंत यांनी यावेळी बोलून दाखवली. रत्नागिरी बसस्थानकाच्या नव्या इमारतीमध्ये चालक आणि वाहक यांच्या विश्रांतीसाठी बांधल्या जाणाऱ्या खोलीतील पलंग, बिछाने, पंखे, एसी यासारख्या आवश्यक सुविधा आपण स्वखर्चाने आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ करणार असल्याची घोषणा नवलाई ग्रुपच्या राजू सावंत यांनी यावेळी केली. या शुभारंभ कार्यक्रमावेळी राजेंद्र सावंत, जितेंद्र सावंत धर्मेंद्र सावंत, संतोष सावंत आणि प्रशांत कदम उपस्थित होते.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here