हापूस म्हणून अन्य आंबा विकल्यास परवाना होणार रद्द

0

रत्नागिरी : जीआय म्हणजेच भौगोलिक मानांकन प्राप्त असलेल्या हापूसच्या ऐवजी त्याच्या नावावर अन्य आंब्याची विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यास अशा विक्रेत्या, व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असून अशांचा व्यापारी परवाना रद्द करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. तशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.

भौगोलिक मानांकनाच्या नावाखाली वेगळ्याच शेतीमालाची विक्री होत असते. सध्या आंब्याचा हंगमा सुर असताना बाजारपेठेत हे प्रकार घजत असल्याच्या तक्रारी येत आहेत. कोकणातील हापूसला जीआय मिळालेले असताही त्याच्या नावावर कर्नाटकचा आंबा विकला जात असल्याच्या अनेक तक्रारी ग्राहकांच्या निदर्शनास येत आहेत. मोठ्या बाजारपेठेत हापूस आंब्याच्या नावाखाली दुसऱ्याच आंब्याची विक्री होत असल्याने मानांकन असलेल्या आंब्याबात फसवणूक केली जात आहे. या सर्व गैरप्रकारांना आळा बसावा म्हणून प्रशासनाने आता पावले उचलली आहेत.

या बाबत पणन मंडळांनी कडक धोरण अवलंबिले असून ‘जीआय’ च्या नावाखाली बनावट हापूस विक्री करणाऱ्यांवर गुन्हा दाखल केला जाणार आहे. अशा धोरणामुळे शेतकऱ्यांची आणि ग्राहकांची जी फसवणूक असणार आहे ती टळणार आहे आणि दर्जदार माल भेटणार आहे. त्या नुसार जर शेतीमालाची विक्री होत नसेल तर बाजार समित्या कारवाई करणार आहेत. मागील काही दिवसंपासून असे प्रकार घडत चालले असल्यामुळे पणन मंडळानेही खबरदारी घेतली आहे. बाजार समित्यांबरोबरच शेती बचतगट, शेती उत्पादक कंपन्यानाही या बाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:03 PM 07-Apr-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here