राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत आज कोणतीही वाढ झालेली नाही, असे सांगितले. तसेच कॅबिनेटच्या आज होणाऱ्या बैठकीत कोरोनाच्या संबंधात चर्चा होईल. तसेच राज्य सरकारने सर्वोतोपरी खबरादारीचे उपाय केले असल्याची माहिती दिली. टोपे यावेळी बोलताना म्हणाले की, मागील 15 तासात दररोज होणाऱ्या कोरोना रुग्णांच्या वाढीला ब्रेक लागला असून राज्यात मागील 15 तासात कोरोनाच्या रुग्णांमध्ये कोणतीही वाढ झाली नसल्याचे टोपे यांनी सांगितले.
