“मला कोणाच्याही पाठिंब्याची गरज नाही” : वसंत मोरे

0

पुणे : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी गुढी पाडव्यानिमित्त आयोजित मेळाव्यात केलेल्या भाषणाचे पडसाद राज्यभर उमटू लागले आहेत.

विरोधी पक्षांबरोबरच पुण्यतातून मनसे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याचे दिसून येत आहे. त्यातच मनसेचे माजी पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे भाषणानंतर अडचणीत आल्याचे सांगितले आहे.

”मी एक लोकप्रतिनिधी म्हणून भूमिका लक्षात घेतली तर १५ वर्षे ज्या भागात लोकप्रतिनिधित्व करतोय त्याठिकाणी सर्व मुस्लिम बांधव माझ्या सोबत आहेत. त्यांचे आणि माझे जवळचे संबंध आहेत. त्या भाषणानंतर ती लोक दहशतीखाली गेली आहेत. ज्यांना आम्ही चाचा, मामु, खाला म्हणत मोठं झालोय. ती लोक आमच्याकडे संशयाने बघायला लागली आहेत. त्यामुळे मन व्यथित झाल्याची प्रतिक्रिया मोरे यांनी दिली होती.

त्यानंतर मोरे हे पुणे शहराध्यक्ष पदावरुन ते बाजूला झाले आहेत. आणि साईनाथ बाबर यांची शहराध्यक्षपदासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. वसंत मोरे यांनी साईनाथ बाबर यांना ट्विटर हॅण्डलवरून शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच साईनाथ चांगला कार्यकर्ता त्यामुळे पक्षातच राहीन. मी स्वयंभू आहे मला कोणाच्या पाठींब्याची गरज नसल्याची स्पष्ट भूमिका त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना मांडली आहे.

मोरे म्हणाले, मी नाराज नाही. हेच मी सगळ्यांना गेले दोन ते तीन दिवसापासून सांगत आहे. मी एक लोकप्रतिनिधी म्हणून माझी भूमिका मांडली आहे. शहराध्यक्ष अन लोकप्रतिनिधी म्हणून अडचण झाली होती. मी मे महिन्यापर्यत शहराध्यक्ष पदावर राहील. त्यानंतर शहराध्यक्ष असे मी गेल्या महिन्यात राज साहेबांना सागितले होते. मी कधीही पक्षावर खोटं प्रेम केलं नाही. जे पोटात तेच डोक्यात अन् जे डोक्यात तेच ओठात असते. त्यामुळे मी स्वयंभू आहे मला कोणाच्या पाठींब्याची गरज नसल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:14 PM 07-Apr-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here