१२० पेक्षा उच्च अश्‍वशक्ती नौकांचा डिझेल कोटा लवकरच मच्छीमारांना मिळणार

0

रत्नागिरी : सागरी मासेमारी अधिनियमात सुधारणेसह १२० पेक्षा उच्च अश्‍वशक्ती नौकांचा डिझेल कोटा मच्छीमारांना देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तयारी दर्शवली आहे. १२० पेक्षा उच्च अश्वशक्ती असलेल्या नौकांचा डिझेल कोटा तत्काळ मंजूर करून मागील तीन चार वर्षापासूनची प्रलंबित थकित डिझेलवरील मूल्यवर्धित विक्रीकर प्रतिपूर्ती रक्कम वितरित करण्यास उपमुख्यमंत्री पवार यांनी मान्यता दिली असून तसे आदेश लवकरच काढण्यात येणार आहेत.

सागरी मच्छिमार संस्था व मच्छिमारांच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या दालनात ४ एप्रिल रोजी बैठक झाली. यावेळी मत्स्य व्यवसाय मंत्री अस्लम शेख यांच्यासह वित्त, गृह, महसूल विभागाचे अप्पर सचिव, नियोजनसह मत्स्यचे प्रधान सचिव, आयुक्त, राज्य शिखर संघाचे अध्यक्ष रामदास संधे, संचालक जयकुमार भाय, विजय गिदी व मच्छीमार प्रतिनिधी मार्तंड नाखवा व प्रभाकर कोळी, संदिप बारी आदी उपस्थित होते.

यावेळी सागरी मासेमारी अधिनियम १९८१ यात सुधारणा करण्यासाठी २१ नोव्हेंबर २०२१ रोजी जारी केलेल्या काही अटी व शर्ती मागे घेऊन नव्याने फेर सुधारणा करण्यासाठी लवकरात लवकर बैठक घेवून मच्छीमारांचे हिताचे दृष्टीने निर्णय घेण्यासाठी सकारात्मक चर्चा झाली.हाय स्पिड डिझेलचे कन्झ्युमर किंमतीत झालेली वाढ त्वरित कमी करण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करुन इतर राज्याप्रमाणे मच्छीमारांना डिझेलवर सवलत देण्याचे आश्वासन मंत्री पवार यांनी दिले.

आर्थिक वर्षाचा डिझेल कोटा मंजूर झालेनंतर पुन्हा टप्याटप्याने डिझेल मंजूर करण्याचे धोरणास स्थगिती देण्यात येवून एकाच वेळी वार्षिक डिझेल कोटा मंजूरीस दुजोरा देण्यात आला. पर्सिननेट मासेमारीसंबंधी केंद्र सरकाशी चर्चा करून सागरी हद्द ठरविण्यासाठी कार्यवाही करण्यात येणार आहे. मच्छीमार संस्थांचे बर्फ कारखान्याकरिता मिळणा-या सबसिडीत वाढ करण्याचे आश्वासन दिले.

प्रकल्पासाठी मच्छीमार संस्थांना दिलेल्या जमिनींची लीज वाढवून देण्यासंबंधी त्वरिल योग्य ती पाऊले उचलली जाणार आहेत. बंद पडलेल्या पायलेट प्रोजेक्टवरील प्रलंबित कर्जे व त्यावरील व्याज माफ करणेसंबंधीचा प्रस्ताव सादर करून सदर प्रकरण निकाली काढणेचे आश्वासन पवार यानी दिले. महिला मच्छीमार संस्था स्थापन करणेसाठी असणारा कायदा शिथिल करून मच्छीमार महिलांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्याचे आश्वासनही यावेळी उपमुख्यमंत्री यांनी दिले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:33 AM 08-Apr-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here