कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारकडून अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. तसेच गर्दी करू नका, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका, स्वच्छता राखा, आवशक्यता असेल तरच घराबाहेर पडा, प्रवास टाळा,’ असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जनतेला केलं आहे. याचाच धागा पकडत ‘भाजपा’च्या नेत्या पंकजा मुंडे यांनी सात दिवस मुंबईची लोकल सेवा बंद केल्यास लाखो लोकांना करोना’च्या संसर्गापासून रोखता येईल, असं मत पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलं आहे. पंकजा मुंडे म्हणतात, ‘मुंबई बंदची मदत होऊ शकते का? जर हे नियोजनबद्धपणे मुंबई बंद केली तर लोक यासाठी तयारी म्हणून जीवनावश्यक वस्तू घरात आणून ठेवतील. जर 7 दिवसांसाठी लोकल ट्रेन बंद राहिल्या तर लाखो लोकांना कोरोनाच्या संसर्गापासून रोखण्यात मदत होईल. आवश्यक दुकानं उघडी ठेवता येतील, मात्र शॉपिंग बंद ठेवावी. अशा प्रयत्नांचा नक्कीच उपयोग होईल.”
