रत्नागिरी : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, अंगणवाड्या, मॉल, व्यायामशाळा, सिनेमागृह, नाट्यगृहांसह गर्दीची ठिकाणे 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात आले असून जिल्ह्यात मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे मंदिरही दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. बाहेरुन येणार्या नागरीकांवर प्रशासनाचे विशेष लक्ष असून रत्नागिरी जिल्ह्यातील चेकपोस्टवर आणि रेल्वेस्थानकांवर आरोग्य तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली.
