भाजपा स्थापना दिनानिमित्त भाजपा चिपळूणतर्फे सामाजिक न्याय पंधरवडा सुरू

0

चिपळूण : ६ एप्रिल २०२२ भाजपा स्थापना दिनानिमित्त सामाजिक न्याय पंधरवडा ७ ते २० एप्रिल २०२२ असा कार्यक्रम भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशकडून जाहीर करण्यात आला आहे.

७ एप्रिल जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून भाजपचे चिपळूण तालुका अध्यक्ष वसंत ताम्हणकर यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र शिरगावला सदिच्छा भेट दिली. वैद्यकीय अधिकारी मृणाली कासारे, आरोग्य सेविका, कर्मचारी यांना जागतिक आरोग्य दिनाच्या भारतीय जनता पार्टी चिपळूण तालुक्याच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.

प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना तसेच १२ ते १६ वर्षाच्या मुलांना कोरोना विषयी लसीकरण बाबत जनजागृती होण्यासाठी तसेच या योजनेचा जास्तीत जास्त लाभार्थींना लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे. तसेच सध्या मोठ्या प्रमाणावर तापमान वाढत असल्याने सर्प, विंचू जमिनीतून बाहेर येत आहेत. रात्री अपरात्री सर्प, विंचू चावलेले पेशंट हॉस्पिटलमध्ये येतात त्यांना वेळेवर उपचार व्हावेत. औषधांचा साठा वाढवावा अशा सूचना देण्यात आल्या.

यावेळी युवा मोर्चा माजी जिल्हा सरचिटणीस कौस्तुभ जोशी, तालुका उपाध्यक्ष संजय पंडव, तालुका चिटणीस मधुकर फके, शक्तीकेंद्र प्रमुख राजेंद्र जाधव, अतिश सोनकर, शक्तीकेंद्र प्रभारी जितेंद्र खेतले, युवा कार्यकर्ते उमेश पुजारी, कामगार आघाडी सहसंयोजक शैलेश लब्धे उपस्थित होते. वैद्यकीय अधिकारी सौ. कासारे, शिरगाव आरोग्य केंद्रात आल्यापासून दवाखान्यात येणाऱ्या रूग्णांना चांगल्याप्रकारे सहकार्य मिळते असे कौस्तुभ जोशी यांनी सांगितले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:03 PM 08-Apr-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here