दुबईहून प्रवास केलेल्या 63 वर्षीय रुग्णाचा आज सकाळी 7 वाजता कस्तुरबा रुग्णालयात मृत्यू झाला. यावर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सह्याद्री अतिथीगृह येथून दिलेली माहिती अशी कि, सदर व्यक्तीची कोरोनाची चाचणी झाली होती. मात्र या व्यक्तीचा मृत्यू कोरोनामुळे झाला की अन्य पूर्व आजारामुळे याची खात्री केली जात आहे. ही व्यक्ती ५ मार्चला दुबईहून आली होती. त्यांना ७ मार्चला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर श्वसनासंबंधीच्या आजाराचे उपचार सुरू होते. त्यानंतर त्यांना कस्तुरबा मध्ये दाखल करण्यात आले. सुरुवातीला त्यांनी औषधोपचाराला प्रतिसाद दिला. आज सकाळी 7 वाजता त्यांचा मृत्यू झाला.
