अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना अटक; सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल

0

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘सिल्वर ओक’ या निवासस्थानावर चप्पल आणि दगडफेक केल्याच्या घटनेचे पडसाद उमटले होते.

राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे. यातच मंत्री हसन मुश्रीफ यांनी याप्रकरणी वकील गुणरत्न सदावर्ते यांची भाषणं तपासली पाहिजेत, अशी मागणी केली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांनी वकील गुणरत्न सदावर्ते यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. आता त्यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. सदावर्ते हे एसटी कर्मचाऱ्यांचे वकील आहेत.

शरद पवार यांच्या निवासस्थानी सिल्व्हर ओक बंगल्यावर गुनरत्न सदावर्ते व एस. टी.कर्मचाऱ्यांनी अनधिकृत प्रवेश केल्याप्रकरणी गावदेवी पोलीस ठाणे येथे कलम १४२,१४३,१४५,१४७,१४९,३३२,३५३,३३३,४४८,४५२,१०७,१२० (ब), भा.द.वी. r/w क्रिमिनल अमेंडमेन्ट कलम ७, महाराष्ट्र पोलीस ॲक्ट कलम ३७ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून सदर गुन्ह्यात गुणरत्न सदावर्ते यांच्यासह १०३ आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. साधारण ७.३० वाजताच्या सुमारास ४ ते ५ पोलीस सदावर्ते यांच्या घरी पोहोचले होते आणि त्यानंतर त्यांना ताब्यात घेतले.

आंदोलनानंतर सदावर्ते यांची प्रतिक्रिया
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक येथील निवासस्थानाबाहेर एसटी कर्मचाऱ्यांनी अचानकपणे आंदोलन केले. या घटनेवर एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी प्रतिक्रिया दिली होती. “एकशे चोवीस महिलांचे कुंकू पुसले गेले. हल्लेखोर असते, तर ते व्यथित आणि चक्कर आलेले कसे असतील? बांगड्या फोडणं हे गुलामगिरीतून बाहेर येण्याचे लक्षण आहे,” असंही ते म्हणाले होते.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:13 AM 09-Apr-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here