पुढील आठडवड्यात बँका चार दिवस बंद!

0

नवी दिल्ली: बँक ग्राहकांना पुढील आठवड्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. तुमचं बँकेत जाऊन करावं लागणारं कोणतही काम बाकी असेल तर ते पुढच्या आठवड्यातील मंगळवारपर्यंत पूर्ण करून घ्या. कारण पुढील आठवड्यात 4 दिवस बँका बंद राहणार आहेत. पीएसयू बँकाचा असणारा बँकांच्या मेगा विलिनीकरणाला विरोध, पगारवाढ आणि आठवड्यातून 2 दिवस सुट्टी या विविध मागण्यांसाठी बँक युनियनकडून 27 मार्चला संप करण्यात येणार आहे. पुढील आठवड्यात सोमवारी आणि मंगळवारी बँका खुल्या राहतील. मात्र बुधवारी गुढी पाडवा आणि तेलगू नवीन वर्षदिवस असल्या कारणाने बँकांना सुट्टी असेल. तसेच बंगळुरु, चेन्नई, हैदराबाद, मुंबई आणि नागपूरमध्ये 25 मार्चला वसंत उत्सवनिमित्त बँका बंद राहतील. तर 27 मार्च गुरुवारी बँका सुरु होतील. मात्र 28 मार्च चौथा शनिवार तर 29 मार्च रोजी रविवारची सुट्टी असल्यामुळे एकूण 4 दिवस बँका बंद आहेत.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here