पुढील आदेश येईपर्यंत सर्व निवडणूक प्रक्रिया स्थगित – राज्य निवडणूक आयोग

0

कोरोनाचा राज्यातील वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्य सरकारने निवडणूक आयोगाला केली प्रतिबंधात्मक, खबरदारीचा उपाय म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती होती. त्यानुसार सर्व निवडणूक प्रक्रिया राज्य निवडणूक आयोगाकडून पुढे ढकलण्यात आल्या आहेत. पुढील आदेश येईपर्यंत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित सर्व निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या १० ऑगस्ट २००५ च्या निकालानुसार नैसर्गिक आपत्ती अथवा आकस्मिक परिस्थिती उद्भवल्यास निवडणुका पुढे ढकलण्याचा अधिकार राज्य निवडणूक आयोगाला आहे. ही बाब लक्षात घेऊन राज्य निवडणूक आयोगाने सर्व निवडणुकांशी संबंधित प्रभाग रचना, मतदार यादी व प्रत्यक्ष निवडणूक इत्यादी स्वरुपाचे सर्व कार्यक्रम मंगळवार १७ मार्चपासून स्थगित केले आहेत.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here