उमराठ कोंडवीवाडी येथे आरोग्य तपासणी शिबीर

0

गुहागर : गुहागर तालुक्यातील हेदवी आरोग्य केंद्रातर्फे ३० वर्षांवरील ग्रामस्थांसाठी मोफत असांसर्गिक आजार नियंत्रण कार्यक्रमांतर्गत आरोग्य तपासणी शिबीर उमराठ कोंडवीवाडी येथील अंगणवाडीत घेण्यात आले.

या शिबिराचे उद्घाटन उमराठचे सरपंच जनार्दन आंबेकर व उमराठ आरोग्य उपकेंद्राच्या समुदाय आरोग्य अधिकारी प्रिया उरकुडे यांच्याहस्ते झाले.

या शिबिरात सर्दी, ताप, खोकला, वजन, उंची, ब्लड प्रेशर, डायबेटिसबाबत रक्त तपासणी, स्त्री/पुरूषांचे इतर आजार आदींची तपासणी करण्यात आली. हे शिबीर हेदवी आरोग्य केंद्राचे डॉ. प्रताप गुजोंटे यांच्या टीममधील आरोग्य अधिकारी प्रिया उरकुडे, लॅब टेक्निशियन समीरा पाटील आणि आरोग्य सेवक अजय हळये, उमराठच्या आशा सेविका सौ. वर्षा गावणंग, हेदवीच्या सौ. पूजा माटल यांनी उत्तमरित्या पार पाडले.

हे आरोग्य शिबीर उमराठ कोंडवीवाडीत प्रथमच झाल्याने ग्रामस्थांनी आरोग्य टीमचा सन्मान केला. कोंडवीवाडी मंडळाचे अध्यक्ष भिकू मालप, माजी उपसरपंच गणपत गावणंग, माजी अध्यक्ष देवजी गावणंग, ग्रामस्थ सोनू धनावडे, शांताराम गावणंग व महिला मंडळाच्या अध्यक्षा लतिका गावणंग यांचाही सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन कोंडवीवाडी प्राथमिक शाळेचे शिक्षक संजय सोनवणे यांनी केले. कारकून नितीन गावणंग व उदय गावणंग यांनी सहकार्य केले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:47 PM 09-Apr-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here