जिल्हाधिकाऱ्यांनी पाणी योजना ताब्यात घ्यावी : अॅड. पटवर्धन

0

रत्नागिरी : शहरासाठी तत्कालीन युती शासनाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष बाब म्हणून पाणी योजना मंजूर केली गेली. ३ वर्ष या पाणी योजनेचे पैसे नगरपालिकेकडे पडून आहेत. यामुळेच एक दिवसाआड पाण्याची वेळ आली व महिला भगिनींच्या डोळ्यात पाणी आले. सत्ताधाऱ्यांना विजयाचा कैफ चढल्याने पाणी योजना अपुरी राहिली. ही योजना जिल्हाधिकाऱ्यांनी ताब्यात घेऊन निश्चित कालखंडात पूर्ण करावी, अशी मागणी भाजपचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी केली. अॅड. पटवर्धन म्हणाले, पाणी योजनेअभावी दररोज पाणी दुर्भिक्षाला सामोरे जावे लागत आहे. पालिकेच्या अकार्यक्षम कारभारामुळे ही वेळ आली आहे. सातत्याने जनतेने कौल देऊन विजयी केल्यामुळे सत्ताधाऱ्यांना कैफ चढला आहे. ही योजना पालिका पूर्ण करेल, असे दिसत नाही. सध्या शहराला एक दिवस आड पाणीपुरवठा केला जात आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here