नागपूर | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाबाबत मोठा खुलासा केला आहे. आदित्य ठाकरे यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यास तयार आहोत, असं फडणवीस म्हणाले आहेत. ठाकरे घराण्यातील निवडणूक लढवणारे आदित्य ठाकरे हे पहिले सदस्य असतील. त्यामुळे त्यांना सरकारचा भाग म्हणून बघायला आम्हाला अवडेल, याबाबत टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. राज्यात शिवेसना भाजप समान जागांवर निवडणूक लढणार आहेत. आणि उर्वरित जागा आमच्या मित्रपक्षांसाठी सोडण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. दरम्यान, आदित्य ठाकरे यांना तरूणाईचा मोठा पाठिंबा आहे. त्यांना चांगला प्रतिसादही मिळत आहे त्यांच्या जनआशीर्वाद यात्रेला मी शुभेच्छा दिल्या आहेत, असंही मुख्यमंत्री म्हणाले.
