अज्ञाताकडून दुचाकीस धडक; चालकाविरोधात गुन्हा

0

रत्नागिरी : ओव्हरटेक करताना दुचाकीस धडक देत अपघात केल्याप्रकरणी अज्ञात दुचाकी चालकाविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही अपघाताची घटना सोमवार १६ मार्च रोजी सकाळी १० वा.सुमारास परकार हॉस्पीटल जवळ घडली. याबाबत अब्दुल सलाम करीम काझी (३५, रा. सोमेश्वर) यांनी शहर पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार, सोमवारी सकाळी ते आपल्या ताब्यातील दुचाकी घेवून ओसवाल नगर ते परकार हॉस्पीटल असा जात होते. त्याच सुमारास एक अज्ञात तरुण आपल्या ताब्यातील दुचाकी घेवून भरधाव वेगाने त्यांच्या पाठीमागून आला व त्याने काझी याला ओव्हरटेक करताना त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये काझी यांना दुखापत झाली.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here