रत्नागिरी : जिल्हाध्यक्षपदाची धुरा ॲड. दीपक पटवर्धन यांच्याकडे आल्यानंतर शहराध्यक्ष पदावर सचिन करमरकर यांची नियुक्ती करण्यात आली. भाजप शहराध्यक्ष पदाची धुरा हाती घेतल्यानंतर सचिन करमरकर यांनी शहराची जम्बो कार्यकारिणी जाहीर केली आहे. या कार्यकारिणीत सरचिटणीस, चिटणीस, विशेष निमंत्रित यांच्यासह १३८ जणांना संधी देण्यात आली आहे. यामध्ये संदीप सुर्वे, राजन पटवर्धन यांनी सरचिटणीसपदी तर राजन फाळके, नितीन गांगण, दादा ढेकणे, निलेश आखाडे यांची चिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सुभाष देव यांना निमंत्रित म्हणून स्थान देण्यात आले आहे. शेखर लेले, मिलिंद साळवी, सुजाता साळवी, निशा आलीम, नितीन सुर्वे, भानुशाली यांची उपाध्यक्षपदी नेमणूक केली आहे.
