राजभवनात जुन्या तारखेची कागदपत्रं तयार करण्याचा प्रयत्न : संजय राऊतांचा गंभीर आरोप

0

मुंबई : आयएनएस विक्रांत निधी प्रकरणावरुन सध्या राज्यातील राजकीय वातावरण चंगलेचं तापलं आहे. शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजप नेते किरीट सोमय्या हे एकमेकांवर आरोप करताना दिसत आहेत.

आयएनएस विक्रांत निधी गैरव्यवहार प्रकरणावरुन संजय राऊत यांनी आज पुन्हा किरीट सोमय्या यांना टीकेचं लक्ष्य केलंय. या गैरव्यवहाराची व्याप्ती मोठी आहे. या प्रकरणात सोमय्यांचे लोक राजभवनात जाऊन जुन्या तारखेची कागदपत्रं तयार करण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे. राजभवनानं अशा देशविरोधी कृत्यात सहभागी होऊ नये, असं राऊत यांनी म्हटलं आहे.

आयएनएस विक्रांत निधी प्रकरणातील घोटाळा हा मोठा आहे. यातून बऱ्याच गोष्टी बाहेर येणार आहेत. मोठमोठ्या लोकांना धमकावून हे लोक पैसे काढत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांवर केला आहे. दिल्लीतून दबाबव आणून खोटी कागदपत्रे तयार करण्यासाठी दबाव आणण्याचा प्रयतन होत असल्याचा आरोपही राऊतांनी केला आहे. न्यायालयात सत्याचा विजय होईल असेही ते म्हणाले. कालपासून किरीट सोमय्या यांच्या टोळीची माणसे राजभवनाकडे जात आहेत. जुन्या तारखेची कागदपत्रे तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळं राजभवनानं या कृत्यामध्ये सामील होऊ नये अस राऊत म्हणाले.

संजय राऊत यांनी किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या फरार असल्याचा दावा केला आहे. हे दोघे मेहुल चोकसी प्रमाणे पळून तर गेले नाहित ? असा सवाल देखील राऊत यांनी उपस्थित केला आहे. आयएनएस विक्रांत निधी गैरव्यवहारावरुन राऊत यांनी सोमय्या यांच्यावर जोरदार निशाणा लगावला. यावेळी राऊत यांनी आणखी एक गंभीर आरोप केला आहे. राजभवनात सोमय्यांचे लोक जुन्या तारखेची कागदपत्रं तयार करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप राऊतांनी केला आहे. राजभवनानं देशविरोधी कृत्यात सहभागी होऊ नये असे राऊत यांनी म्हटले आहे.

दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी पार पडणार आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांची विक्रांत फाईल्स उघडत, अनेक खळबळजनक आरोप केले होते. आयएनएस विक्रांतसाठी गोळा केलेल्या मदतनिधीत किरीट सोमय्या यांनी घोटाळा केल्याचा आरोप संजय राऊतांनी केला आहे. याप्रकरणी किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांच्या विरोधात ट्रॉम्बे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाखल झालेल्या गुन्ह्यानंतर किरीट सोमय्या यांनी अटकपूर्व जामीनासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. किरीट सोमय्या यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर 11 एप्रिल म्हणजेच, आज सुनावणी पार पडणार आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:15 PM 11-Apr-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here