कोरोनाने घेतला पाकिस्तानातील पहिला बळी

0

इस्लामाबाद – आता यूरोप बरोबरच आशिया खंडातही कोरोना व्हायरसने पाय पसरायला सुरुवात केली आहे. आज पाकिस्तानात कोरोना व्हायरसने पहिला बळी घेतल्याची नोंद झाली. कोरोनामुळे पाकिस्तानच्या लाहौरमध्ये मंगळवारी सकाळी इम्रान नावाच्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला. तो हफीजाबाद येथील रहिवासी होता. पाकिस्तानात अचानकपणे कोरोनाग्रस्तांमध्ये वाढ झाली आहे. इम्रानला सोमवारी रात्री लाहोरमधील मायो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दाखल करण्यात आले तेव्हा तो बेशुद्धावस्थेत होते. मंगळवारी सकाळी त्याचे निधन झाले, अशी माहिती रुग्णालयातील सुत्रांनी दिली. पाकिस्तानात गेल्या 24 तासांत तब्बल 130 हून अधिक जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यामुळे संपूर्ण पाकिस्तानात भीतीचे वातावरण असून कोरोना संसर्ग झालेल्यांचा आकडा 184 वर पोहोचला आहे. पाकिस्तानात ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला तो ईरानमधून आला होता. तो 14 दिवस सीमा भागातच देखरेखित होता. मात्र लाहोरमधील मायो रुगणालयात त्याचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानातील सिंद्धप्रांताला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. येथे एकून 155 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. करोनाचा सामना करण्यास इम्रान सरकार अपयशी ठरल्याने त्यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. करोनाची लागण झालेले बरेच रुग्ण इराणमधून आलेले आहेत.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here