डॉ. आनंद आंबेकर यांची MUST प्राध्यापक संघटनेच्या राज्यस्तरीय समितीवर नियुक्ती

0

रत्नागिरी : महाराष्ट्र धर्मनिरपेक्ष शिक्षक संघटनेच्या नवीन कार्यकारणी मध्ये राज्यस्तरीय एक्झिक्युटिव्ह मेंबर म्हणून डॉ. आनंद आंबेकर यांची सदस्य म्हणून निवड झाली आहे.

डॉ. विजय पवार यांच्या अध्यक्षतेखाली तसेच डॉ. शांतज देशभ्रतार यांच्या महासचिव पदाच्या मार्गदर्शनाखाली गेली अनेक वर्ष प्राध्यापक प्रश्नांवर अग्रेसर असणारी संघटना काम करत आहे. थोड्याच कालावधीमध्ये नावारूपास आलेले मस्ट (MUST) ही आश्वासित करणारी संघटना म्हणून प्राध्यापक त्याकडे बघत आहेत. 2005 पूर्वीच्या प्राध्याकांना जुनी पेन्शन योजना सुरू करण्यासंदर्भात अतिशय नियोजनबद्ध आणि अभ्यासपूर्ण संघर्ष करून उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार उदय सामंत यांच्यासमोर प्राध्यापकांचे प्रश्‍न सक्षम पणे मांडून 2005 पूर्वी सेट-नेट नसलेले परंतु सेवेत असलेल्या प्राध्यापकांना पेन्शन सुरू करण्याचे शासकीय आदेश काढण्यात आला.

या महत्त्वाच्या निर्णयांमध्ये महाराष्ट्र धर्मनिरपेक्ष शिक्षक संघटनेचा अनेक प्राध्यापकाने सक्रिय काम केले त्यामध्ये प्रा. डॉ. आनंद आंबेकर यांनी महत्त्वाची जबाबदारी सांभाळली होती त्यांच्या सक्रिय सहभागामुळे मस्ट संघटनेने त्यांना राज्य समितीवर एक्झिक्युटिव्ह मेंबर म्हणून नियुक्त केले आहे. यासाठी संपूर्ण कोकणातील प्राध्यापकांच्या प्रश्नांसाठी नेतृत्व करावे असा संघटनेचा आग्रह आहे.

सदर प्राध्यापक संघटनेचे काम करण्यासाठी नवीन जबाबदारीमुळे कोकणातील प्राध्यापकांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी उपयोगी होणार आहे. पुढील कार्यासाठी डॉ. आनंद आंबेकर यांना सर्व सहकाऱ्यांनी शुभेच्छा दिले आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:41 PM 11-Apr-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here