हिंद मराठा महासंघाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी आनंदराव भोसले

0

रत्नागिरी : खेडचे विधीतज्ज्ञ आनंदराव भोसले यांची हिंद मराठा महासंघाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड जाहीर झाली आहे. हिंद मराठा महासंघ राष्ट्रीय संस्थापक सदानंद भोसले, राष्ट्रीय अध्यक्ष उज्ज्वलसिंहराजे गायकवाड, राष्ट्रीय सरचिटणीस अॅड. किशोर बांदल देशमुख यांच्या सूचनेनुसार राष्ट्रीय सचिव शिवाजीराव पालांडे यांनी ही निवड जाहीर केली.

अॅड. भोसले खेडमध्ये वकिली व्यवसायाच्या माध्यमातून समाजसेवा करत आहेत. तसेच त्यांचे शैक्षणिक कार्यसुद्धा वाखाणण्याजोगे आहे. सहजीवन शिक्षणसंस्थेच्या आय. सी. एस. महाविद्यालयाच्या संचालकपदी ते काम पाहत आहेत. समाजहित डोळ्यासमोर ठेवूनच मराठा महासंघ धोरणानुसार काम करावयाचे आहे, असे प्रतिपादन अॅड. भोसले यांनी केले आहे.

राष्ट्रीय अध्यक्ष संजय पवार, कार्याध्यक्ष राजेंद्र आंब्रे, राज्य कार्याध्यक्ष सुधीर पालांडे, राज्य उपाध्यक्ष महेश पालांडे, कोकण प्रदेश सरचिटणीस प्रवक्ते संजय रेवणे, पालघर जिल्हाध्यक्ष संतोष सावंत, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, हिंद मराठा महासंघ महिलाध्यक्षा ज्योती भोसले आदींनी त्यांचे अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here